नारायण राणे भाजपात नको पण ‘एनडीए’मध्ये हवेत ?

नारायण राणे भाजपात नको पण ‘एनडीए’मध्ये हवेत ?

ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता पुढे काय करणार या कडे सर्वाचं लक्ष लागल आहे. आता राणेंनी स्वत: भाजपमध्ये येण्याऐवजी स्वतंत्र पक्ष काढून राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये सामील व्हावे, अशीच इच्छा भाजप श्रेष्ठींची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नारायण राणे काँग्रेसमध्ये अस्वस्थ होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. तत्पूर्वी त्यांनी भाजपमध्ये जाण्याचे वेळोवेळी संकेत दिले. मात्र, सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेला नारायण राणे मंत्रिमंडळात नको आहेत. यासह अन्य कारणास्तव राणेंचा भाजपप्रवेश लांबणीवर पडला. याच पार्श्वभूमीवर सोमवारी नारायण राणेंनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. मात्र, ही भेट कोणत्याही निर्णयाविना झाली.

दरम्यान, या भेटीदरम्यान नारायण राणेंना स्वतंत्र पक्ष काढा आणि ‘एनडीए’मध्ये या, असा सल्ला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.

 

COMMENTS