नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे?

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे?

काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहे अशा बातम्या गेल्या काही दिवसापासून येत आहे. राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबतची चर्चा गेला दीड महिना सुरू आहे. यावरच नारायण राणे भाजप प्रवेशाबाबतचा प्रश्न पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारला असता, ‘नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांबाबत मी बोलणार नाही. त्या दोघानांही शुभेच्छा आहे’, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी तो विषय टाळला. राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला,  त्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकारांशी विविध विषयांवर बोलले.

COMMENTS