नाशिक महापालिकेत चक्क गायीला वाहिली श्रद्धांजली

नाशिक महापालिकेत चक्क गायीला वाहिली श्रद्धांजली

नाशिक महापालिकेच्या सभागृहात चक्क गायीला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. प्रसिद्ध सायकलपटू जलपाससिंग बिर्दी आणि अभिनेत्री उमा भेंडे यांच्यासोबत गायीलाही दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 
गेल्या 13 जुलै रोजी पवननगरमधील एका खड्ड्यात पडल्यानंतर करंट लागल्यामुळे गायीचा मृत्यू झाला होता. राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने विजेच्या तारा टाकण्यासाठी हा खड्डा खोदला होता. नाशिकचे वॉर्ड क्रमांक 25 चे शिवसेना नगरसेवक श्यामकुमार साबळे यांनी गायीवर अंत्यसंस्कार केले. सोबतच गायीच्या मृत्यूसाठी त्यांनी नाशिक महानगरपालिकेला जबाबदार ठरवले.  नाशिक महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. गुरुवारी शिवसेनेचे नगरसेवक श्यामकुमार साबळे यांनी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत गायीला श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव ठेवला होता. नेहमी आपले गायप्रेम जाहीर करणाऱ्या भाजपाने प्रस्ताव स्विकारला नसता तर कोंडीत सापडण्याची भीती होती. त्यामुळे भाजपाने हा प्रस्ताव स्वीकारत गायीला श्रद्धांजली वाहिली.
श्रद्धांजलीवरून सर्वत्र टीका  झाल्यानंतर, असा काही प्रकार झालाच नाही, असा भाजपकडून  दावा केला जात आहे. गायीला श्रद्धांजली वाहण्याचा देशातील हा पहिलाच प्रकार असेन .

 

 

COMMENTS