नाशिक महापालिकेत लिलावावरुन राडा, भाजप नगरसेवकाने मारहाण केल्याचा आरोप !

नाशिक महापालिकेत लिलावावरुन राडा, भाजप नगरसेवकाने मारहाण केल्याचा आरोप !

नाशिक – नाशिक  महापालिका मुख्यालयात नवरात्रोत्सवतील लिलावाच्या करणावरून एकाला मारहाण करण्यात आली आहे.या मारहाणीत भाजप नगरसेवकाचा सहभाग असल्याचा आरोप समबंधीतांनी केला आहे. मात्र हा आरोप नगरसेवकाने फेटाळून लावला आहे.

मुंबई नाका परिसरात दरवर्षी नाशिकची ग्राम दैवत कालिका मातेचा यात्रोत्सव भरतो, त्यासाठी लिलाव प्रक्रिया महापालकेच्या मुख्यालयात पार पडत असताना लिलावाचे दर का वाढीतो या कारणावरून दीपक डोके या तरुणाला मारहाण करण्यात आलीय, मात्र या प्रकरणी अद्याप ही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

दरम्यान पोलिसांनी महापालिका मुख्यालयात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून तणाव कायम आहे. एकीकडे शहरात महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी सत्ताधारी नागरिकांवर कर वाढीचा बोजा टाकता येते तर दुसरीकडे त्याच पक्षाशी समबंधीत कार्यकर्ते लिलावाचे दर वाढावीत जास्तीचे पैसे उकळत असून नागरीकांना मारहाण करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

COMMENTS