‘ना ना करते, प्यार तुम्हीं से कर बैठे’ नीतीशकुमारांवर हल्लाबोल

‘ना ना करते, प्यार तुम्हीं से कर बैठे’ नीतीशकुमारांवर हल्लाबोल

नितीश कुमार यांनी बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमधील राजकारण वेगवेगळी वळणे घेताना दिसले. नितिश कुमारांनी बुधवारी संध्याकाळी राजीनामा दिल्यापासून ते गुरूवारी सकाळी नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेइपर्यंत अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.

भाजपचा रस्ता नितीश कुमारांनी पकडल्यानंतर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी नितीश कुमारांवर हल्लाबोल केला आहे. आज सकाळी ट्विटकरून नितीश कुमारांच्या निर्णयाची खिल्ली उडविली आहे. अखिलेश यादव यांनी ‘ना ना करते, प्यार तुम्ही से कर बैठे,’ असे टि्वट करत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची खिल्ली उडविली आहे.

अखिलेश यादव यांनी बिहारमधील राजकारणावर 1965 मध्ये आलेल्या ‘जब जब फूल खिलें’ या चित्रपटातील गाण्याचा आधार घेऊन भाष्य केले आहे. अखिलेश यादव यांनी नितीश कुमार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाची ‘ना ना करते, प्यार तुम्हीं से कर बैठे, करना था इंकार मगर इकरार तुम्हीं से कर बैठे…बिहार टुडे’ असे टि्वट करून खिल्ली उडवली आहे.

 

COMMENTS