नितीशकुमारांचा काॅंग्रेसला दे धक्का, एनडीएच्या उमेदवाराला दिला पाठिंबा ! 

नितीशकुमारांचा काॅंग्रेसला दे धक्का, एनडीएच्या उमेदवाराला दिला पाठिंबा ! 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पाटण्यात पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी कोविंद यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे  नितीश कुमार  यांच्या पाठिंब्याने आता कोविंद यांची राष्ट्रपतीपदासाठी दावेदारी अधिक बळकट झाल्याचे दिसत आहे. तर विरोधी पक्षांच्या एकजुटीला मोठा धक्का समजला जातोय.

नितीश कुमार यांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार पाठिंबा दिल्याने अनेक राजकीय तर्क-वितर्क लावले जात आहेत. नितीश कुमार यांच्या निर्णयाने मोदींविरोधात एकवटत असलेल्या विरोधकांची हवा टाईट झाल्याचेही म्हटले जात आहे. कारण नितीश कुमार यांना मोदींच्या विरोधातील महत्वाचा आणि ताकदवान चेहरा म्हणून पाहिले जाते. मात्र नितीश कुमार यांच्या निर्णयाने कॉंग्रेसच्या मोदीविरोधी मोहिमेत फूट पाडल्याची चर्चा आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस देशातील सर्व छोट्या पक्षांना एकत्र आणण्याच्या विचारात आहे. त्यामध्ये नितीश कुमार यांची महत्वाची भूमिका असेल, असे मानले जात होते. पण गेल्या काही दिवसांपासूनची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यातील जवळीक राजकीय चर्चांना बळ देत आहे.

COMMENTS