नितीश कुमार यांचा बहुमतासाठी प्रस्ताव सादर, विधानसभेत राडा

नितीश कुमार यांचा बहुमतासाठी प्रस्ताव सादर, विधानसभेत राडा

नितीशकुमार यांनी आज (शुक्रवारी) बहुमतासाठी विधानसभेत प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, त्याआधी सभागृहात प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. राजीनाम्यानंतर 16 तासांतच नितीशकुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री झाले. राजद त्यांच्याविरुद्ध काही डाव टाकण्यापूर्वीच गुरुवारी सकाळी 10 वाजता नितीश व भाजपचे सुशील मोदी यांनी शपथग्रहण केली.

दरम्यान, तेजस्वी यादव यांची विरोधी पक्षनेता म्हणून घोषणा करण्यात आली आहे. यावेळी तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांवर हल्लाबोल करत माझ्या आत्मविश्वासाला नितीश कुमार घाबरले असा टोला लगावला आहे. जेडीयू आमदारांनी मात्र आपण सहजपणे बहुमत सिद्ध करु असं सांगितलं आहे. 243 जागांच्या विधानसभेत एनडीएच्या सहाय्याने नितीश कुमार यांनी बहुमताचा 122 हा आकडा गाठला असल्याचा दावा करण्यात आला आहे. एनडीएकडून बुधवारी राज्यापालांना 132 आमदारांची यादी सोपवण्यात आली. यामध्ये जेडीयूचे 71, भाजपाचे 53, आरएलएसपीचे दोन, एलजेपीचे 2 आणि तीन अपक्ष आमदारांचा समावेश आहे.

बिहारमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर एनडीएचे सरकार अाले. मात्र, ते पाडण्यासाठी व वाचवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या. नितीश यांनी 12 वर्षांत सहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. लालूंना हालचाली करण्यासाठी वेळ मिळू नये म्हणून ते पण घाईत आहेत. लालूंनी नितीश यांना भस्मासूर संबोधले. तर, राहुल गांधी यांनी हे घडणार असल्याचे तीन-चार महिन्यांपूर्वीच आपल्याला माहिती होते, असे सांगितले.

COMMENTS