नितेश राणेंची अटक आणि सुटका

नितेश राणेंची अटक आणि सुटका

सिंधुदुर्ग – सहाय्यक मत्स्य आयुक्तांच्या विरोधात मासेफेक आंदोलन केल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्यासह 24 जणांना अटक केली होती. त्यांना कुडाळ सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी नितेश राणे यांच्यासह 24 जणांची प्रत्येकी सात हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. 

आमदार नितेश राणे हे मच्छिमारांच्या विविध प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी मालवण येथील सहाय्यक मत्स्य आयुक्तांच्या जिल्हा कार्यालयात गेले होते. यावेळी राणेंसोबत आलेल्या मच्छिमारांनी थेट आयुक्तांच्याच टेबलावर मासे टाकले. एवढेच नाही तर नितेश राणे यांनीही त्यांच्या अंगावर मासे फेकले होते. यावर राणे थांबले नव्हते तर त्यांनी,  तुम्ही निट कामे करत नाही, असा आरोप करत अधिकाऱ्यांना झापले होते.
तत्पूर्वी, सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांनी राणेंवर सरकारी कामात हस्तक्षेप, बेकायदेशीर जमाव करून मासेफेक केल्याची तक्रार पोलीस स्थानकात दिली होती. तसेच तक्रारीची प्रत राज्य मत्स्य आयुक्त, पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी, यांच्याकडे देवूनही त्यांनी तक्रार केली.

 

 

 

 

 

COMMENTS