नीतीशकुमार यांचा राजीनामा आता पुढे काय ?  या आहेत तीन शक्यता !

नीतीशकुमार यांचा राजीनामा आता पुढे काय ?  या आहेत तीन शक्यता !

बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये पुढचे राजकारण काय वळण घेणार याकडे सगळयांच लक्ष लागलंय. नीतीशकुमार हे भाजपच्या मदतीनं सरकार स्थापन करतात का ?  की भाजप बाहेरुन पाठिंबा देतो हेही पहावं लागेल. भाजप आणि नीतीशकुमार एकत्र आले तर ते बहुमतासाठीची मॅजिक फिगर गाढू शकतात. 243 जागा असलेल्या बिहारमध्ये सरकार स्थापनेसाठी 122 जागांची आवश्यकता आहे. जेडीयूचे 71 आणि भाजपचे 53 यांची बेरीज 124 अशी होते. त्यामुळे ते दोन्ही पक्ष एकत्र आले तर सहज सरकार स्थापन करु शकतात. हीच शक्यता सध्यातरी प्रबळ दिसत आहे. मात्र तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तर पुन्हा नीतीश कुमार आणि लालू यांच्यात पॅचअप होतं का ? हीही शक्यता आहे.  शेवटचा पर्याय म्हणून बिहारमध्ये काही दिवस राष्ट्रपती राजवट लावून निवडणुकाही होऊ शकतात.

 

243 – एकूण जागा (मॅजिक फिगर – 122 )

80 – राजद

71 – जेडीयू

27 – काँग्रेस

53 भाजप

इतर 3

COMMENTS