नेटवरही भगवं वादळ, ट्रेंडींगमध्ये ‘मराठा क्रांती मोर्चा’

नेटवरही भगवं वादळ, ट्रेंडींगमध्ये ‘मराठा क्रांती मोर्चा’

मराठा क्रांती मोर्चाची भव्यता आणि अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर महाराष्ट्राच्याराजधानीत आलेलं भगवं वादळ सोशल मीडियावरही जोरदार घुमू लागलं आणि  ट्विटर ट्रेंडमध्ये #MarathaKrantiMorcha सर्वांत वर चर्चेत आला. इंग्रजीसह मराठी आणि हिंदी व इतर भाषांतूनही सोशल मीडियावर मराठा क्रांती मोर्चाबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. 

सोशल मीडियावर मराठा क्रांती मोर्चाच्या विषयावर सर्वाधिक चर्चेत राहिला. महाराष्ट्रासह देशभरातील आणि जगभरातील केवळ मराठी नव्हे अमराठी माणसांनीही विविध ऑनलाईन व्यासपीठांवरून मराठा क्रांती मोर्चाबद्दलच्या चर्चेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने महिलांवरील अत्याचार, आरक्षण, सामाजिक आर्थिक विषमता अशा विविध मुद्द्यांवर सोशल मीडियावर साधकबाधक चर्चा होताना दिसून येत

COMMENTS