नोदाबंदीमुळे मंदी आल्याचा कांगावा, महागाई कुठेही नाही – चंद्रकांत पाटील

नोदाबंदीमुळे मंदी आल्याचा कांगावा, महागाई कुठेही नाही – चंद्रकांत पाटील

नोटाबंदीमुळे मंदी आल्याचा कांगावा करण्यात येत आहे. असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. राज्यासह देशात कुठेही मंदी किंवा महागाई नाही,  नोदाबंदीमुळे मंदी आल्याचा कांगावा सध्या सुरु आहे. असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

‘नोटाबंदीमुळे महागाई वाढल्याचा आणि बाजारात मंदी आल्याचा कांगावा करण्यात येत आहे. मात्र देशात कुठेही अशी परिस्थिती नाही. सर्वसामान्य माणूस आनंदात आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचे कोणतेही प्रतिकूल परिणाम झालेले नाहीत. लोक मोठ्या प्रमाणात कॅशलेस व्यवहारांकडे वळले आहेत. त्यामुळे नोटाबंदीचे प्रतिकूल परिणाम दिसून येत नाहीत. लोकांनी आता कॅशलेस व्यवहारांची सवय करुन घेतली आहे. लोकांनी स्वत:ला बदलासोबत जुळवून घेतले आहे. असे पाटील म्हणाले.

नोटाबंदीमुळे गरिबांना मनस्ताप श्रीमंतांना काहीही फरक पडला नाही, अशी टीका विरोधकांकडून केली जाते. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘वर्षानुवर्षे गरिबांचे शोषण करुन ज्यांनी नोटा जमा केल्या. त्या नोटांनी गाद्या भरल्या. त्यांना नोटाबंदीमुळे सर्व नोटा बँकेत जमा कराव्या लागल्या.’

COMMENTS