लालकृष्ण अडवाणी यांनी असा साजरा केला 90 वा वाढदिवस !

लालकृष्ण अडवाणी यांनी असा साजरा केला 90 वा वाढदिवस !

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा 90 वा वाढदिवस अंध मुलांसोबत साजरा केला. यावेळी त्यांनी मुलांना जेवायला वाढले.

अनेक वरिष्ठ नेत्यांनी आणि मंत्र्यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरवरुन अडवाणींना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहे.  ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले की, ‘माजी उपपंतप्रधान यांनी आपल्या कष्टाची आणि समर्पणाने राष्ट्र उभारणीत योगदान देऊन एक विशेष स्थान निश्चित केले आहे.’

 

COMMENTS