नोबेल विजेती मलाला युसुफझाई युनोची शांतीदूत

नोबेल विजेती मलाला युसुफझाई युनोची शांतीदूत

नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई हिला जगातील सर्वात तरूण शांतीदूत बनण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी या सन्मानासाठी मलालाच्या नावाची घोषणा केली. लहान मुलींमध्ये शिक्षणाच्या प्रसाराचे व्हावे या हेतूने हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे गुटेरेस यांनी जाहीर केले आहे.

संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात पुढच्याच आठवड्यात मलालाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जगातील एखाद्या नागरिकाला संयुक्त राष्ट्राकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे.

COMMENTS