न्यायाधीश सी.एन. कर्नान यांना 6 महिन्यांचा कारावास

न्यायाधीश सी.एन. कर्नान यांना 6 महिन्यांचा कारावास

सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवारी) कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. सी. ए. कर्नन यांना अवमानना केल्या प्रकरणी दोषी धरले आणि सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 

कर्णन यांनी काल अॅट्रोसिटी कायद्याचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे एस खेहर यांच्यासह आठ न्यायमूर्तींना पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. त्याविरोधात खेहर यांच्यासह उर्वरित न्यायमूर्तींनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. या खटल्याचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

आपल्यावरील आरोप फेटाळत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खेहर आणि अन्य न्यायाधीशांनी न्यायालयीन अवमानाची कारवाई सुरु करून आणि माझी वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश देऊन माझा छळ केला होता असे कर्णन म्हणाले. त्यामुळे मी त्यांना दलित अत्याचर प्रतिबंधक कायद्यान्वये दोषी ठरवून प्रत्येकी पाच वर्षे कैद आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावत आहे, असे कर्णन यांनी सांगितले होते. मात्र आता त्यांचे हे म्हणणे चुकीचे ठरवत न्यायालयाने कर्णन यांच्यावरील शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे. पदावर असताना तुरुंगवासाची शिक्षा झालेला कर्नन उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश आहेत.

 

 

COMMENTS