नवी दिल्ली – देशभरात आज बकरी ईदचा सण उत्साहात साजरा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहे. ट्विटरच्या माध्यमातून मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि सुसांवादाची भावना वृध्दिंगत होवो, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Best wishes on Id-ul-Zuha. May the spirit of harmony, brotherhood and togetherness be furthered in our society.
— Narendra Modi (@narendramodi) September 2, 2017
मुस्लीम प्रथांनुसार ईदच्या दिवशी भारतात मुस्लीम बांधवांकडून बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. प्रिय असणाऱ्या गोष्टींचा त्याग करण्याच्या वृत्तीचे प्रतीक म्हणून कुर्बानी दिली जाते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीसुद्धा ईदच्या शुभेच्छा देणारे ट्विट केले आहे. देशातील तसेच परदेशातील मुस्लीम बांधवांना कोविंद यांनी ईद-उल-अज़हाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Greetings to all my fellow citizens, especially to my Muslim brothers & sisters in India & abroad, on Idu’l Zuha, tweets President Kovind
— ANI (@ANI) September 2, 2017
COMMENTS