‘पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास मी तयार आहे.’ असे वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. अमेरिकेत बोलताना त्यांनी पहिल्यांदाच पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्याची तयारी दर्शवली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राहुल यांच्या नावाची घोषणा पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून केली नव्हती. याविषयी राहुल गांधींनीदेखील कोणतेही भाष्य केले नव्हते. मात्र आता त्यांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास तयार असल्याचे म्हटले.
यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका केली. राहुल गांधी म्हणाले, ‘‘मुख्य आर्थिक सल्लागार व संसदेतील सदस्यांना विचारात न घेता अंमलात आणलेल्या नोटाबंदी निर्णयामुळे अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे जीडीपीवर परिणाम मोठा परिणाम झाला आहे.’’ ‘हिंसा, द्वेष आणि ध्रुवीकरणाचे राजकारण यांनी भारतात डोके वर काढले आहे. हे मुद्दे देशासाठी नवे असून, हाच ‘न्यू इंडिया’ आहे,’ अशा शब्दांमध्ये गांधींनी मोदींवर जोरदार टीका केली. ‘भाजप ही एक मशीन आहे. या मशीनशी संबंधित हजारो लोक सतत कम्युटरसमोर बसलेले असतात आणि माझ्याबद्दल अपप्रचार करतात. एका सभ्य माणसाच्या इशाऱ्यावर हे सगळं चालतं आणि हाच सभ्य माणूस सध्या देश चालवत आहे,’ असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.
COMMENTS