“विधानसभेत स्तनपान खोलीची व्यवस्था करा”

“विधानसभेत स्तनपान खोलीची व्यवस्था करा”

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर आता कायदेमंडळात अर्थात विधान सभा आणि लोकसभेमध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक तरुण महिला आमदार, खासदार होत आहेत. अशातच अनेक महिलांना आपल्या लहाण बाळांना घेऊन विधानसभेत यावं लागतंय. त्यातून स्तनपान करतना त्या महिलांची कुंचबना होत आहे. असाच अनुभव आसाममधील एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजपच्या विद्यमान आमदार अंगूरलता डेका यांना आला. त्यांना महिनाभरापूर्वी म्हणेजेच 3 ऑगस्टला मुलगी झाली. विधानसभेत आल्यानंतर त्यांना बाळाला स्तनपान करण्यासाठी घरी जावे लागत असे. त्यामुळे कामकाजात सलगपणे भाग घेता येत नव्हता. त्यामुळे त्यांनी विधानसभेत स्तनपान खोलीची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. अंगूरलता यांच्याप्रमाणे अनेक महिलांना असा अनूभव येत असेल. त्यामुळेच स्तनपान खोलीची लोकसभा असो किंवा कोणतीही विधानसभा व्यवस्था करवी लागणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तर महिलांची संख्या 50 टक्के आहे. त्यामुळे तिथेही अशा खोलीची आवश्यकता आहे. त्यामुळे तिथेही अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. तरच महिला कारभारामध्ये चांगल्या प्रकारे सहभागी होऊ शकतील.

COMMENTS