पंतप्रधान मोदींची चहाची टपरी होणार पर्यटनस्थळ

पंतप्रधान मोदींची चहाची टपरी होणार पर्यटनस्थळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमधील वडनगर येथील रेल्वे स्टेशनवर एके काळी चहा विकायचे काम करत होते. मोदी ज्या दुकानात चहा विकत असत त्या दुकानाला आता पर्यटनस्थळाचा दर्जा मिळणार आहे. अशी घोषणा केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी सोमवारी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लहानपणी ही टपरी चालवत असत. वडनगर रेल्वे स्थानकावर एक छोटी चहाची टपरी आहे.  याच ठिकाणाहून ते चहा विकत असत. या ठिकाणाला पर्यटन दर्जा देऊन पंतप्रधान पर्यंतचा मोदींचा खडतर प्रवास जगासमोर मांडला जावा या उद्देशाने हे काम हाती घेतल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.

दरम्यान,  2014 निवडणुकीच्या आधी नरेंद्र मोदींनी आपल्या प्रचारादरम्यान चहा विकल्याची बाब सांगितली होती.  नरेंद्र मोदींनी निवडणुकांच्या सभेत सांगितले होते की, लहानपणी त्यांनी आपल्या वडिलांसोबत वडनगर रेल्वेस्टेशनवर चहा विक्री केली होती.

केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागने रविवार वडनगरचा दौरा करून मोदी यांच्या ‘चहाच्या टपरी’ची पाहणी केली. त्यानंतर या ठिकाणाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासंबंधी घोषणा केली. या टपारीचे मूळ सौंदर्य आहे तसेच ठेवले जाणार आहे. त्यात कोणताही बदल केला जाणार नाही, असेही यावेळी सांगण्यात आले.

COMMENTS