नोटाबंदीवरुन पी. चिदंबरम यांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

नोटाबंदीवरुन पी. चिदंबरम यांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा पूर्णपणे अपयशी ठरली असून, बनावट चलनी नोटा, दहशतवाद, देशातील काळ पैसा रोखणे यापैकी नोटाबंदीचा एकही उद्देश सफल झाला नाही. अशी टीका पी.चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.   दोन हजाराच्या नोटेच्याही बनावट नोटा अनेक ठिकाणी आढळून आल्या असल्याच चिदंबरम यांनी म्हटले. आज मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पी. चिदंबरम बोलत होते. 

नोटाबंदीमुळे विकासदर दोन टक्क्याने कमी होईल, असं मनमोहन सिंह म्हणाले होते.  ते खरं ठरलं असून सलग सहाव्या तिमाहीत विकासदरात घसरण झाली.  तसंच येणा-या तिमाहीत ही घसरण कायम राहील. आता भारत ही जगात सर्वात वेगाने वाढणारी व्यवस्था राहिली नाही, असं म्हणतं पी चिंदबरम यांनी घसरलेल्या जीडीपीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. नव्या नोटांची छपाई करण्यासाठी 8 हजार कोटींचा खर्च झाला. नोटाबंदीवर 21000 कोटी खर्च झाले. असंही चिदंबरम यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयाला धाडसी निर्णय म्हंटलं होतं. पण चुकीचे निर्णय घ्यायला धाडस लागत नाही. चुकीची जबाबदारी स्वीकारायला धाडस लागतं, असा टोला चिंदबरम यांनी मोदींना लगावला आहे. नोटाबंदीमुळे जानेवारी 2017 या एका महिन्यात 15 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या . तर 104 लोकांचा मृत्यू झाला. लघु आणि मध्यम उद्योग बंद झाले. उत्पादन घटले, मागणी घटली, कृषी विकासदर घटला, निर्यातही घटली.  सरकार दरवर्षी दोन कोटी नव्या नोकऱ्या देणार होते, मग नोकऱ्या कुठे आहेत?, असा सवाल चिदंबरम यांनी उपस्थित केला.

 

COMMENTS