पनवेल – पनवेल महापालिका निवडणुक जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांची लगबग सुरू झाली आहे. शेकाप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी करण्याचं निश्चित झालं आहे. मात्र शिवसेना भाजपच्या युतीचा निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळं शिवसेनेनं आता स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. सर्व 78 जागांसाठी शिवसेनेनं उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आदेश बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली खारघर पक्ष कार्यालयामधे या मुलाखती घेण्यात आल्या. 20 प्रभागातील 78 जागांसाठी 200 पेक्षा अधिक इक्छुक उमेदवारांनी काल मुलाखती दिल्या. दरम्यान युतीसाठीही दोन्ही पक्षात बोलणी सुरु असल्याचं समजतंय. शिवसेनेनं पक्षासाठी 40 जागांची मागणी केली आहे. मात्र भाजपनं शिवसेनेला केवळ 20 जागा देऊ केल्या आहेत अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळं जागावाटपाचं कोडं सुटतंय की मध्येच अडकतंय हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
Newer Post
खरंच सोनम कपुरला राष्ट्रगीत येत नाही ?
COMMENTS