परभणीत शेतकरी – पोलिसांत धुमश्चक्री, विमा भरण्यास वेळ लागत असल्याने शेतकरी संतप्त !

परभणीत शेतकरी – पोलिसांत धुमश्चक्री, विमा भरण्यास वेळ लागत असल्याने शेतकरी संतप्त !

परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसा पासून ऑनलाइन विमा भरण्यास खुपवेळ लागत असून शेतकऱ्यांना दोन- दोन दिवस बँकेच्या रांगेत घालावे लागत आहेत. जिंतूर तालुक्यातील बोरी येथे पीक विमा भरण्यासाठी वेळ लागत असल्याने शेतकरी संतप्त झाले होते. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी वेळ लागत असल्याने शेतकऱ्यांची आणि बँक व्यवस्थापनामध्ये बाचाबाची झाली. बँकेत एकाचं खिडकीवर विमा भरला जात होता. त्यात वाढ करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. पण कर्मचारी कमी असल्याच बँकेने सांगितल्याने शेतकरी सतंप्त झाले. परिणामी जिल्हा मध्यवर्ती बँक बंद करावी करावी लागली. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी रास्ता रोकोचा मार्ग अवलंबला. पण एक तास होऊन ही शेतकऱ्यांचा रास्ता रोको संपत नसल्याने पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला. यामध्ये संतप्त शेतकऱ्यांनी ही पोलिसांच्या आणि बँकेच्या दिशेने  दगडफेक केली. तर याच अडचणीपोटी पाथरी येथे ही जिल्हा मध्यवर्ती बँके समोर  शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.

31 तारीख विमा भरण्याची शेवटची तारीख असल्याने शेतकऱ्यानी विमा भरण्यासाठी एकच गर्दी केलीये, पण बँकांमधील तांत्रिक बाबी आणि अटीमुळे शेतकऱ्यांची अडचण होते आहे.

 

 

 

 

COMMENTS