मुंबईत रेल्वेच्या परळ-एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 22 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेला सरकारच जबाबदार आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तसेच बुलेट ट्रेनच्याऐवजी रेल्वेसेवा सक्षम करण्यावर भर देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनचा फायदा गुजरातला होणार आहे. त्याचा महाराष्ट्राला काहीच फायदा होणार नाही. बुलेट ट्रेनऐवजी त्यासाठी येणारा खर्च रेल्वेच्या सक्षमीकरणावर देणे गरजेचे आहे. रेल्वेचे सक्षमीकरण केल्यावर अशा दूर्घटना घडणार नाहीत, असे अजित पवार म्हणाले.
COMMENTS