पश्चिम बंगाल सरकारच्या मुलींसाठीच्या कन्याश्री योजनेला संयुक्त राष्ट्रसंघात गौरवण्यात आलंय. या योजनेला संयक्त राष्ट्राचा पहिला पुरस्कार मिळाला आहे. काल नेदरलँडच्या हेग मध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा पुरस्कार स्विकारला. 62 देशातील 552 स्पर्धकांना मागे टाकत कन्याश्री योजनेने हा पुरस्कार पटकावला. राज्यातील मुलींच्या शैक्षणिक सबलीकरणासाठी पश्चिम बंगाल सरकारने 2011 मध्ये ही योजना सुरू केली होती. आतापर्यंत पश्चिम बंगालमधील 40 लाख मुलींना याचा फायदा झाला आहे. मुलींची शाळेतून, महाविद्यालयातून आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमातून गळती कमी व्हावी यासाठी त्यांना थेट आर्थिक मदत या योजनेतून दिली जाते. मुलींचे बालविवाह टाळण्यासाठीही या योजनेतून मदत केली जाते.
COMMENTS