राणे – उद्धव यांचातील अंतर कमी होतंय ?

राणे – उद्धव यांचातील अंतर कमी होतंय ?

मुंबई – गोवा महामर्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमीपूजनीचा कार्यक्रम कोकणवासींच्या दृष्टीने तर खूप महत्वाचा होताच, पण त्याचसोबत का कार्यक्रमाची चर्चा झाली ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे एका स्टेजवर आल्यामुळे. उद्धव आणि राणे तब्बल एका तपानंतर म्हजेच 12 वर्षानंतर एका स्टेजवर एकत्र आले. त्या दोघांमध्ये फक्त दोन दोन खुर्चांचं अंतर होतं. राणे आणि उद्धव यांच्यामध्ये केंद्रीय मंत्री गिते आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या खुर्चा होत्या. मात्र जसा कार्यक्रम सुरू झाला तेंव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रश्मी ठाकरे यांना स्टेजवर बोलावून घेतले, त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील बाजुला झाले आणि उद्धव यांच्या शेजारी रश्मी ठाकरे यांना जागा मिळाली. हा झाला कार्यक्रमातील आसनव्यवस्थेतील जवळीक.

कार्यक्रमात आधी नारायण राणे यांचं भाषण झालं, राणेंनी त्यांच्या भाषणात उद्धव आणि रश्मी ठाकरे यांचं नाव घेतलं. राणे यांनी जेंव्हा विकासाच्या कामात राजकारण नको या वाक्यावरही उद्धव यांनी त्यांना दाद दिली. त्यानंतर उद्धव यांनीही त्यांच्या भाषणात माझे जुने सहकारी नारायणराव राणे असा आदरपूर्वक उल्लेख केला.

नारायण राणे यांनी उद्धव यांच्या कार्यशैलीला कंटाळून शिवसेना सोडल्याचं सर्वानंच ठाऊक आहे. शिवसेना सोडताना आणि त्यानंतरही राणे यांनी उद्धव यांच्यावर तिखट भाषेत टीका केली होती. अर्थात त्याला उत्तरही उद्धव यंनी खास ठाकरे शैलीतच दिलं होतं. एकमेकांचं तोंडही बघायला दोन्ही नेते तयार नव्हते. मात्र शुक्रवारच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी एका स्टजवर यायला होकार देत चक्क एकत्र स्टेज शेअर केलं. त्यामुळे आता दोन्ही नेत्यांमधला दरावा कमी झालाय की काय ? अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

COMMENTS