“पाकिस्तानातील आजच्या राजकीय घडामोडी भारतासाठी चिंताजनक”

“पाकिस्तानातील आजच्या राजकीय घडामोडी भारतासाठी चिंताजनक”

मुंबई – पाकिस्तानामध्ये आज पंतप्रधान नवाज शरीफ यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे पाकिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते. ही अस्थिरता भारताच्या दृष्टीने चांगली नाही असं मत पाकिस्तान विषयीचे अभ्यासक सुधींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे. पाकिस्तानमधल्या अस्थिरतेचा फायदा तिथलं लष्कर घेऊ शकतं. आणि ते भारतासाठी आणि एकूणच जागतिक सुरक्षेच्या दृष्टीनं घातक असल्याचं कुलकर्णी यांनी  म्हटलं आहे. नवाज शरीफ यांचे भारतासोबतचे आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे संबंध चांगले होते. ते भारतासोबत चांगले संबंध ठेऊ इच्छित होते. त्यामुळे त्यांच्या जाण्यानं भारताला तोटाच होईल अस मतही कुलकर्णी यांनी मांडलं.

COMMENTS