पानसरे हत्येप्रकरणी समीर गायकवाडला सशर्त जामीन

पानसरे हत्येप्रकरणी समीर गायकवाडला सशर्त जामीन

कोल्हापूर – ज्येष्ठ विचारवंत आणि नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाडला आज सशर्त जामीन मंजूर झाला. 25 हजारांच्या जातमुचलक्यावर  जिल्हा सत्र न्यायाधीश एल.डी. बिले यांनी गायकवाडचा जामीन मंजूर केला.  दरम्यान या जामीनाला सरकारी पक्षातर्फे मुंबई हायकोर्टात आ्हान दिलं जाणार आङे. जामीन मंजूर करताना त्याला काही न्यायालयानं त्याला काही अटी घातल्या आहेत. समीर गायकवाडला घातलेल्या अटी खालीलप्रमाणे

महाराष्ट्र राज्या सोडून बाहेर जायचं नाही.

पासपोर्ट कोर्टाच्या ताब्यात द्यावा लागणार आहे.0

दर रविवारी तपास यंत्रणेकडे 11 ते 1 वेळेत  हजेरी लावावी लागणार आहे.

जिथं राहणार आहे त्याचा पत्ता कोर्टाला सादर करावा लागणार आहे.

COMMENTS