मेट्रोसाठी खोदल्या जाणा-या खड्ड्यांमुळे पावसाळ्यात मुंबईकरांना त्रास होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे पावसाळ्यापुरते मेट्रोचे काम थांबवावे किंवा खड्डे खोदू नयेत, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.
कोणत्याही प्रकल्पासाठी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे खोदू नयेत, असे आयुक्तांचे आदेश असतानाही मेट्रोसाठी वेगळा न्याय का ? असा सवाल सेनेने केला आहे. मेट्रोच्या खड्ड्यांमुळे काही समस्या उदभवल्यास याची जबाबदारी आयुक्तांची राहिली असं सेनेने म्हटले आहे. शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांनी आयुक्तांना यासंबधी पत्र पाठविले आहे.
COMMENTS