पासपोर्ट शुल्कात आता 10 टक्क्यांची कपात

पासपोर्ट शुल्कात आता 10 टक्क्यांची कपात

पासपोर्ट शुल्कात कपात केल्याची घोषणा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज केली आहे. आता पासपोर्ट बनवण्यासाठी एकूण शुल्कापैकी 10टक्के कमी पैसे मोजावे लागणार आहेत. 8 वर्षाखालील मुले आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ लोकांना याचा फायदा मिळणार आहे. सध्या इतरांना जे शुल्क आकारले जाते तेच द्यावे लागणार आहे.

सुषमा स्वराज यांनी आणखी एक महत्वाची घोषणा केली. यापुढे पासपोर्ट इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये मिळणार आहे.  यापुर्वी पासपोर्टमध्‍ये इंग्‍लिशमधून वैयक्‍तिक माहिती मागवण्‍यात येत होती. ही माहिती इंग्‍लिशमध्‍ये लिहिण्‍याची अनिवार्यता दूर होणार आहे. हिंदी भाषेमुळे पासपोर्टमध्‍ये विचारण्‍यात आलेली माहिती भरण्‍यास सोपे होणार आहे. पण पासपोर्टवरील संबंधित व्यक्तीच माहिती ही इंग्रजीमध्येच असणार आहे.

पासपोर्ट ॲक्‍टला 50 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने परराष्‍ट्र मंत्री स्‍वराज यांनी ही घोषणा केली आहे. या औचित्‍याने सुषमा स्‍वराज यांनी स्‍मारक स्‍टॅम्‍पदेखील लॉन्‍च केले आहे.

COMMENTS