12 वर्षांनंतर राणे – उद्धव एकाच व्यासपीठावर 

12 वर्षांनंतर राणे – उद्धव एकाच व्यासपीठावर 

सिंधुदुर्ग – शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ इथे मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण भूमिपूजनचा कार्यक्रम आज झाला. या ठिकाणी ठाकरे आणि राणे हे दोघेहीजण तब्बल 12 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आले.  रश्मी ठाकरे यांनी देखील या कार्यक्रम उपस्थिती लावली होती.  

तब्बल 12 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर ठाकरे आणि राणे हे दोघेहीजण आले. पण या दोघांमधील कोणत्याही प्रकारची चर्चा झाले नाही. उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यामध्ये दोन खुर्च्यांचं अंतर होतं. राणेंच्या शेजारी शिवसेनेचे नेते अनंत गीते बसले होते. तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूला त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे बसल्या होत्या. उद्धव यांच्या दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले होते.

या भूमिपूजनचा कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उद्धव ठाकरे, सुनील प्रभू, नारायण राणे, रामदास आठवले आदी उपस्थित आहेत. शिवसेना आणि भाजपा कार्यर्त्यांची घोषणाबाजी सुरु, तर दुसरीकडे राणे समर्थकांच्या घोषणा घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे कार्यक्रम स्थळी काही काळ तणाव निर्मीण झाला होता.

दरम्यान,काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सतीश सावंत, राकेश परब, रणजित देसाई यांनी पोलिसांनी प्रवेश नाकारला होता. त्यावेळी दत्ता सामंत आणि सतीश सावंत यांची पोलिसांशी हुज्जत घातली. प्रत्येक पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला व्यासपीठावर  आहे, त्यामुळे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षालाही व्यासपीठवर स्थान द्या. अशी मागणी करण्यात आली होती. ते आमचे काम नाही. आयोजकांचे काम आहे. असे पोलीसांकडून सांगण्यात आले होते.

COMMENTS