पिंपरी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या स्टेनोला 12 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. राजेंद्र शिर्के, असे अटक करण्यात आलेल्या आरोपी स्टेनोचे नाव आहे. आज (सोमवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे थेरगाव येथे 11 इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून 7 इमारतींचे बांधका पूर्णत्वाचा दाखला तक्रारदाराला दिला आहे. व इतर चार इमारतींचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखल्याची फाईल सादर करून ते मिळवून देण्यासाठी शिर्के यांनी 12 लाख रुपयांची मागणी केली होती. दाखला आयुक्तांच्या सहीनंतर मिळणार असल्याने लाच देण्याचे तक्रारदाराने कबूल केले. तक्रारदार व्यावसायिकाने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पिंपरी पालिकेच्या पार्किंगमध्ये सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदार व्यावसायिकाने शिर्के यांना जाळ्यात ओढण्यासाठी दहा लाख रुपयाचे कोरे कागद आणि दोन लाख रूपयांची रक्कम दिली होती.
COMMENTS