मुंबई – पीक विमा भरण्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढवा अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. ‘आज 4 ऑगस्ट आहे पीक विमा भरण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत सरकारने वाढवली आहे. उद्या ती मुदत संपत आहे. मात्र सरकारने याबाबत दोन वेगवेगळे जीआर काढले आहे. ते दोन्ही जीआर वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. सरकारने दोन जीआर काढले म्हणून शेतकरी आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सांगतात की आम्ही तुमचे पीक विम्याचे अर्जही स्वीकारणार नाही आणि पैसेही घेणार नाही. यात शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावं लागतं. उद्या आणि परवा सभाग्रहाचे कामकाज चालणार नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावं. सरकारची यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही यंत्रणा ठप्प आहे. त्यामुळे सभाग्रह संपण्याआधी कृषी मंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं. दोन जीआर पैकी कोणता जीआर ग्राह्य धरायचा. यंत्रणा ही ठप्प आहे, त्याबाबत काही तरी निर्णय घ्या अन्यथा 10 ऑगस्टपर्यंत मुदत वाढ द्यावी.’ अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
.
COMMENTS