पीक विमा भरल्यानंतर बँकेने दिल्या ‘32 जून’ तारीखेच्या पावत्या !

पीक विमा भरल्यानंतर बँकेने दिल्या ‘32 जून’ तारीखेच्या पावत्या !

बीड : एकीकडे शेतकरी पीक विम्याच्या बाबतीत संतप्त झाल्याचे सध्या पाहायला मिळत असताना दुसरीकडे बँक कर्मचारी गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे आज समोर आले आहे. परळी तालुक्यातील धर्मापुरीच्या जिल्हा बँकेच्या शाखेत पीक विमा भरल्यानंतर बँकेने चक्क ‘32 जून 2017’ तारीख असलेल्या पावत्या शेतकऱ्यांना दिल्या आहेत. चुकीचा महिनाच नाही, तर अस्तित्त्वात नसलेली तारीखही बँकेने पावतीवर छापली आहे. बँका शेतकऱ्यांची पीक विम्यावरुन थट्टा करतात की काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

आज राज्यातील शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळते आहे. कारण आज पीक विमा भरण्याचा शेवटचा दिवस असून ऑनलाईनच्या घोळामुळे ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँकांबाहेर रांगाच्या रांगा पाहायला मिळत आहेत. बीड, जालना, परभणी, उस्मानाबाद, यवतमाळमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे.

COMMENTS