भाजपाशी युती हा नितीशकुमारांचा निर्णय दुर्दैवी – शरद यादव

भाजपाशी युती हा नितीशकुमारांचा निर्णय दुर्दैवी – शरद यादव

नवी दिल्ली – गेल्या अनेक दिवसांपासून बिहारमध्ये ‘राजद’ची साथ सोडून भाजपशी हातमिळवणी करण्याच्या नितीश कुमार यांच्या निर्णयावर चुप्पी साधून असणाऱ्या शरद यादव यांनी अखेर आपले मौन सोडले असून सोमवारी त्यांनी संसदेच्या परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

“भाजपशी युतीचा निर्णय मला मान्य नाही. हा एक दुर्दैवी निर्णय आहे. नितीशकुमारांचा हा निर्णय लोकांच्या निवडीविरुद्ध जाणार आहे,” अशी प्रतिक्रिया यादव यांनी व्यक्त केली आहे.

शरद यादव यांनी यावेळी म्हटले की, बिहारमध्ये घडलेला प्रकार हा दुर्दैवी असून जनमताचा त्यामुळे अनादर झाला आहे. जो निर्णय नितीश कुमार यांनी घेतला मी त्याच्याशी सहमत नाही. हे खूपच दुर्दैवी आहे. यासाठी बिहारच्या जनतेने आम्हाला सत्ता दिली नव्हती, असे यादव यांनी म्हटले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांचा महाआघाडीला धोबीपछाड देऊन भाजपबरोबर एका रात्रीत हातमिळवणी करण्याचा निर्णय त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांच्या पचनी पडला नसल्याचे सुरूवातीपासूनच दिसत होते.

COMMENTS