पीक विम्याची मुदत वाढवल्याशिवाय कामकाज होऊ देणार नाही –धनंजय मुंडे

पीक विम्याची मुदत वाढवल्याशिवाय कामकाज होऊ देणार नाही –धनंजय मुंडे

मुंबई – पीक विमा भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी विधान परिषदेतली विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. अनेक शेतकरी बँकांच्या संथ कारभारामुळे विमा भरु शकले नाहीत. 15 -15 तास रांगेत उभं राहूनही शेतक-यांना विमा भरता आला नाही. रांगेत उभं राहिल्याने आतापर्यंत 2 शेतक-यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे सरकारनं विमा भरण्याची मुदत वाढवून द्यावी, जोपर्य़ंत मुदत वाढ मिळत नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालु देणार नाही असा इशाराही मुंडे यांनी दिला आहे.

COMMENTS