पुण्यात अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचीच ताकद असल्याचं दिसून आलं आहे. ‘डीपीसी’च्या सहा जागांसाठी सोमवारी मतदान घेण्यात आले. मंगळवारी कौन्सिल हॉल येथे मतमोजणी झाली. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सदस्यपद निवडणुकीत 40 सदस्यांपैकी 34 जागांवर बिनविरोध झाल्या असून, उर्वरित जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जागा खेचून आणल्या, तर एक जागा अपक्षाला मिळाली. त्यामुळे ‘डीपीसी’मध्ये राष्ट्रवादीच्या सदस्यांची संख्या 21वर तर, भाजपच्या सदस्यांची संख्या 14 वर पोहोचली आहे.
त्यामध्ये अर्चना कामटे, अनिता इंगळे, वैशाली पाटील, स्वाती पाचुंदकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार उमेदवार जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आल्या. माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखा बांदल याही विजयी झाल्या. ‘डीपीसी’च्या 40 जागांपैकी 21 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘डीपीसी’वरील वर्चस्व कायम राहिले आहे.
COMMENTS