मुंबईत चक्रीवादळ येणार नाही, अफवांवर विश्वास ठेऊ नका, मुंबई महापालिकेचे आवाहन

मुंबईत चक्रीवादळ येणार नाही, अफवांवर विश्वास ठेऊ नका, मुंबई महापालिकेचे आवाहन

मुंबई – मुंबईत अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना सोडल्या तर मुंबईत सर्व काही सुरळीत सुरू आहे. मुंबई महापालिकेचे 35 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. मुंबईत चक्रीवादळ येणार असे असा मेसेज सोशल मीडियातून फिरत आहे. मात्र तो पूर्णपणे चुकीचा आहे. असा कोणताही इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आलेला नाही. त्यामळे मुंबईत चक्रीवादळ येणार  अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका अंस आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे.

 

COMMENTS