पुणे : पालकमंत्री गिरीश बापट, महापौर टिळक, सुरेश कलमाडी गणपती विसर्जन मिरवणुकीत सामील

पुणे : पालकमंत्री गिरीश बापट, महापौर टिळक, सुरेश कलमाडी गणपती विसर्जन मिरवणुकीत सामील

पुणे – ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष…अशा भक्तिमय वातावरणात मुंबईचा राजा लालबाग तसेच पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात भक्ती आणि शक्तीचा महापूर ओसंडून वाहत आहे.

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट व महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची  आरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.  माजी केंद्रीय मंत्री व खासदार सुरेश कलमाडी विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहे.

COMMENTS