पुणे – मनसे नगरसेवकाने फोडले एमएसईबीचे आॅफीस !

पुणे – मनसे नगरसेवकाने फोडले एमएसईबीचे आॅफीस !

पुणे – वारंवार निवेदन देऊनही प्रभाग क्र.27 कोंढवा मिठ्ठानगर भागात गेल्या अनेक महिन्यांपासून अघोषित लोडशेडींग करण्यात येत आहे. त्यामुळे प्रभागातील नागरीकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे .या विरोधात आज स्थनिक मनसे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी मनसे स्टईलमध्ये आंदोलन करत कोंढवा येथील महावितरणच्या कार्यलयाची तोडफोड केली.

कोंढवा परिसरातील नागरिकांना काही दिवसांपासून लोडशेडिंगमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे मनसेच्या वतीने कोंढवा महावितरणला 2 ते 3 वेळा निवेदन देण्यात आले होते, परंतु लोडशेडिंग नियमित राहिल्यामुळे मनसे कडून आंदोलन करण्यात आले.

COMMENTS