पुण्यात पाणी पुरवठा प्रकल्पासाठी निधी उभा करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या बॉन्डची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेअर बाजारात नोंदणी करण्यात आली. या बॉन्डच्या माध्यमातून 2264 कोटी रुपये उभे करण्याचा पुणे महापालिकेचा प्रयत्न आहे. आज भव्य कार्यक्रमाचे आयोजन मुंबई शेअर बाजारात करण्यात आले आहे. 2007 नंतर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात कर्ज रोखे उभारणारी पुणे महापालिका ही पहिली महापालिका ठरली असून याबद्दल केंद्रीय मंत्री वैंकय्या नायडू यांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जून मेघवाल उपस्थित होते. तसेच महापौर मुक्ता टिळक आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची ही उपस्थिती होती.
पुणे महापालिकेच्या 24×7 पाणी पुरवठा योजनेसाठी 2264 कोंटीचे कर्जरोखे पुढील पाच वर्षात उभारण्यात येणार आहेत. यातील पहिल्या टप्यातील 200 कोटीचे कर्जरोखे स्वरुपातील पैसे महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज रोखे उभरणारी पुणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे.
COMMENTS