पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

पुणे महापालिकेतील आज स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी दुपारी तीन ते चार या वेळेत अर्ज भरण्याची मुदत होती. मात्र या निवडीवरून भारतीय जनता पक्षातील अंतर्गत वाद समोर आला आहे. भाजपचे गणेश घोष व सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्यात प्रचंड हाणामारी झाली. तसेच महापालिकेतील भाजप व सभागृह नेते यांच्या कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली. 

 

स्वीकृत सदस्य पदासाठी अर्ज करण्याची आज शेवटची मुदत होती. यासाठी भाजपतर्फे नगरसेवक गोपाल चिंतन, देवेगौडा आणि गणेश घोष यांना उमेदवारी देण्याचे ठरले होते. मात्र, ऐन वेळी गणेश घोष यांच्या ऐवजी गणेश बीडकर यांच्या नावाला पसंती देण्यात आली. त्यामुळे गणेश घोष आणि त्यांच्या समर्थकांनी चिडून जाऊन सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या कार्यालयात जाऊन तोडफोड गेली. यावेळी एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याचे देखील समजते. यावेळी गणेश घोष यांनी कार्यालयातील काच फोडून स्वतःच्या डोक्यात मारून घेतली. या राड्यामुळे महापालिकेत एकच गोंधळ उडाला आहे.

COMMENTS