पुणे – पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कचाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. उरूळी देवाची आणि फुरुसुंगी येथील ग्रामस्थ मागील एकोणीस दिवसापासून कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यास विरोध करीत आहे. त्यातच आता महापौर आणि पालकमंत्री परदेश दौयावर गेल्याने कचरा प्रश्न आधिक गंभीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी मनसेच्या वतीने महापौर मुक्ता टिळक यांच्या घराबाहेर कचरा टाकून आंदोलन करण्यात आले.
मनसे गटनेते वसंत मोरे म्हणाले की, पुणेकर जनतेला कचरा कोंडीमध्ये ठेवून महापौर परदेश दौऱ्यावर जातात. ही बाब निषेधार्ह आहे. प्रत्येकाच्या घरात कचरा साठला आहे. त्यामुळे महापौराच्या घरासमोर कचरा फेकून निषेध व्यक्त केला आहे. येत्या काळात प्रश्न न सुटल्यास महापालिका आयुक्तांच्या घरासमोरही कचरा फेकण्याचा इशारा त्यांनी दिला.
COMMENTS