पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावाने सुवर्णपदक देण्यात येणार आहे. यासाठी केवळ शाकाहारी विद्यार्थ्यांनीच अर्ज करावा, अशी अजब अट प्रसिद्धीपत्रकात देण्यात आलीय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या पत्रकानुसार, विज्ञानेतर शाखेचा विद्यार्थीच या पदकासाठी पात्र असेल. 15 नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयांनी यासंबंधीचा प्रस्ताव पाठवायचा आहे. याशिवाय विद्यार्थी दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेतील प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण असावा. त्याने भारतीय व परदेशी क्रीडा स्पर्धांत जास्तीत जास्त पारितोषिके मिळवलेली असावी. त्यातही ध्यानधारणा, प्राणायाम, योगासने करणाऱ्या विद्यार्थ्यास प्राधान्य आहे. विद्यार्थी भारतीय संस्कृती, आचार, विचार, परंपरा अंगीकारणारा असावा. गायन नृत्य, वक्तृत्व, नाट्य व इतर कलांत नैपुण्य असावे. रक्तदान, श्रमदान, पर्यावरण रक्षण, प्रदूषण नियंत्रण, साक्षरता-स्वच्छता मोहीम, एड्सविरोधी जनजागरण मोहिमेत सहभागी असावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा विद्यार्थी शाकाहारी आणि निर्व्यसनी असावा.
COMMENTS