पुण्याचे माजी महापौर भाऊसाहेब खिलारे यांचे निधन

पुण्याचे माजी महापौर भाऊसाहेब खिलारे यांचे निधन

पुणे – पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर भाऊसाहेब खिलारे पाटील यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यात निधन झाले. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पुणे विद्यार्थी गृहाचे ते चेअरमन होते. तसेच 1970 -71 मध्ये ते स्थायी समितीचे अध्यक्षही होते. 1990-91 या काळात ते पुणे महापालिकेच्या महापौरपदी विराजमान झाले. मात्र, यानंतर आपण निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी जाहीर केले होते. खिलारे यांनी जवळपास 25 हून अधिक वर्षे नगरसेवक म्हणून कार्य केले होते.

त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11.00 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

COMMENTS