पुण्यातील कचरा समस्या 21 व्या दिवशीही जैसे थे

पुण्यातील कचरा समस्या 21 व्या दिवशीही जैसे थे

पुण्यातील कचराकोंडीला आज 21 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र कचराकोंडीतून महापालिका पुणेकरांची सुटका करु शकलेली नाही. उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थ मागील वीस दिवसांपासून तेथील कचरा डेपोमध्ये टाकू देत नाही.  त्यामुऴे शहरातील कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न निर्माण झालाय.  शहरात ठिकठिकाणी कचर्‍याचं साम्राज्य पसरलय. ग्रामस्थांसोबतच्या सर्व बैठका निष्फळ ठरल्या. ग्रामस्थांच्या पवित्र्यामुळे पुण्याचा कचरा प्रश्न चांगलाच चिघळत आहे. आता कचरा प्रश्न कधी मार्गी लागणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुण्याचे पालकमंत्री गिरिश बापट तसेच महापौर मुक्ता टिळक विदेश दौर्यावर असल्याने प्रश्न आणखीनच चिघळला. अशा सगळ्या परिस्थितीत कचरा प्रश्नाला आता राजकीय वळण लागलं आहे. विरोधी पक्षांकडून रोज कुठली ना कुठली आंदोलने केली जात आहे. समस्या मात्र आजही जैसे थे आहे.

COMMENTS