पुण्यात शिवसेनेचा कारभारी कोण ?  ‘या’ दोन नावाची आहे चर्चा !

पुण्यात शिवसेनेचा कारभारी कोण ? ‘या’ दोन नावाची आहे चर्चा !

पुणे – विनायक निम्हण यांनी शिवसेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. यानंतर पर्याय कोण अशी चर्चा शिवसेनेत सुरू झाली आहे. माजी आमदार चंद्रकांत मोकाटे व महादेव बाबर हे या पदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमका कोणता निर्णय घेतात याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. 

महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे पन्नास नगरसेवक निवडून आणण्याचा विश्‍वास निम्हण यांनी व्यक्त केला होता. मात्र केवळ दहा नगरसेवक निवडून आले. शिवाजीनगर या निम्हण यांच्या मतदारसंघासह बहुतांश प्रभागात शिवसेनेचा दारूण पराभव झाला. महापालिका निकालानंतर संपर्क प्रमुख पदावरून डॉ. अमोल कोल्हे यांना हटवण्यात आले. त्यांच्या जागी उदय सामंत यांची नेमणूक करण्यात आली.

बदलत्या परिस्थितीत दोन शहराध्यक्ष व दोन संघटक नेमणार की जुन्या फार्म्युल्याप्रमाणे एक शहराध्यक्ष व दोन संघटक अशी रचना करणार याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही, असे या सूत्रांनी सांगितले. गेल्या दहा वर्षात पुण्यातील शिवसेनेचा विस्तार वाढण्याऐवजी तिची ताकद कमी झाली आहे. त्या-त्या काळातील संपर्कप्रमुख आणि शहरप्रमुख हे सारेच त्यासाठी जबाबदार मानले जात आहेत. मात्र यापुढील काळात पुण्यातील पक्ष विस्ताराकडे पुरेसे लक्ष देण्याची तयारी मुंबईतून करण्यात येत असल्याने नव्या शहराध्यक्षांबरोबरच इतर पदाधिकाऱ्यांमध्येदेखील व्यापक बदल करण्यात येणार आहेत. नव्या चेहऱ्यांना अधिक संधी देण्यात येणार असून यात युवासेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडे काही महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाण्याची शक्‍यता आहे.

 

COMMENTS