पुण्यात शिवसेनेचे ‘भीक मांगो’ आंदोलन

पुण्यात शिवसेनेचे ‘भीक मांगो’ आंदोलन

पुणे – 24 तास समान पाणी पुरवठा योजना राबवण्यासाठी 2 हजार 264 कोटी रुपयांच्या कर्ज रोखे उभारण्याचा निर्णय मागील आठवड्यात घेण्यात आला. या निर्णयाच्या निषेधार्थ आज (बुधावर) पुणे महापालिकेत शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख उदय सामंत आणि महापालिका शिवसेना गट नेता संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या आवारात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. काका आमचे खाऊ चे पैसे घ्या, मात्र महापालिकेला कर्ज बाजारी करू नका या आशयाचा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
पुणे शहरात समान पाणी पुरवठा योजना ऱाबवण्यासाठी महापालिका कर्ज घेऊन हा प्रकल्प सुरु करणारा आहे. या निर्णयाचा निषेध असून ज्या भाजपला पुणेकर नागरिकांनी भरभरून दिले असताना कर्ज घेण्याची वेळ आली ही दुर्देवी बाब आहे. असे सामंत म्हणाले.

COMMENTS