प्रकाश आंबेडकर यूपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार, आजच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब ?

प्रकाश आंबेडकर यूपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार, आजच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब ?

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांना यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी उभं केलं जाण्याची शक्यता आहे. डावे पक्ष आंबेडकर यांच्या नावासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी आज यूपीएची बैठक होणार आहे. या बैठकीत डाव्या पक्षांतर्फे प्रकाश आंबेडकर यांचं नाव सुचवलं जाण्याची शक्यता आहे. डाव्यांचा हा प्रस्ताव यूपीएचे इतर घटक स्विकारतात का आणि त्यांनी स्विकारलं तर प्रकाश आंबेडकर उमेदवारी घेतात का ?  ते पहावं लागेल. कारण प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःच एखाद्या आदिवासी व्यक्तीला यूपीएनं उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. एनडीएनं रामनाथ कोविंद या दलित समाजातील व्यक्तीला राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली आहे. त्याला तोडीस तोड म्हणून प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न यूपीएकडून होतोय. प्रकाश आंबेडकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा तर आहेत त्याशिवाय ते स्वतः अकोला लोकसभा मतदारसंघातून  खासदार राहिलेले आहेत. त्यांना मोठा राजकीय आणि सामाजिक कामाचा अनुभव आहे.

COMMENTS