“प्रताप पाटील-चिखलीकर म्हणजे ‘बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना’’

“प्रताप पाटील-चिखलीकर म्हणजे ‘बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना’’

नांदेड – स्वतःच्या पक्षाशी गद्दारी करून भाजपासाठी मताचा जोगवा मागणा-या प्रताप पाटील चिखलीकरांची अवस्था बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना अशी झाली आहे, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी केली आहे.

कमळाच्या नादात स्वतःच्या पक्षाशी गद्दारी करुन भाजपचा प्रचार करणारे शिवसेना आमदार प्रतापराव चिखलीकर यांचे पाय सध्या चिखलात रुतले असल्यानेच ते वायफळ बडबड करीत आहेत. ज्यांना स्वतःच्या ताब्यातील कारखाने आणि संस्था नीट चालविता आल्या नाहीत, ज्यांनी कारखाने विकून स्वतःची घरे भरली अशा मंडळीनी नांदेडच्या विकासाच्या गप्पा माराव्यात हा मोठा विनोद म्हणावा लागेल असा टोला बागवे यांनी चिखलीकरांना लगावला. स्व. शंकरराव चव्हाण यांचा पुरोगामी विचाराचा आणि विकासाचा वारसा खा. अशोकराव चव्हाण समर्थपणे चालवत असून त्यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहराचा विकास झाला असून नांदेडची जनतेला याची चांगली कल्पना आहे. भाजपचा विकास वेडा झाला आहे. अशा वेड्या विकासाची नांदेडला आवश्यकता नाही त्यामुळे नांदेडकर भाजपला पराभूत केल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपला नांदेडात सगळ्या जागांवर उमेदवार उभे करता आले नाहीत. त्या भाजपने चिखलीकरांसारख्या बुजगावण्याच्या जीवावर काँग्रेसला पराभूत करण्याची दिवास्वप्नं पाहू नयेत असा टोला बागवे यांनी लगावला.

COMMENTS