नाशिक – मुंबईत अनेकदां नालेसाफ न झाल्यामुळे पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होती. सेना- भाजपची सत्ता असल्यामुळे सेना सर्व कामे झाल्याचा दाव करते मात्र तेच नाशिकमध्ये पावसामुळे पाणी साठल्याने शिवसेनेनेकडून आंदोलन करण्यात आले. नाशिकमध्ये भाजपची सत्ता असल्याने सेना भाजपावर टीका करण्याची एक ही संधी सोडत नाही असं दिसून येते.
नाशिकात पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पोहून विद्यार्थी शिवसेने तर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पोहून विद्यार्थी सेनेने अनोखे आंदोलन केले. नाशिककरांसाठी मोफत फडणवीस वॉटर पार्क असे फलक लावण्यात आले होते. महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालय बाहेर शिवसेना विद्यार्थी सेनेचे आंदोलन करत मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
COMMENTS