फ्रान्सचे नवे अध्यक्ष,  अनोखी लव्ह स्टोरी, आणि वर्तमानपत्रांच्या हेडलाईन !

फ्रान्सचे नवे अध्यक्ष,  अनोखी लव्ह स्टोरी, आणि वर्तमानपत्रांच्या हेडलाईन !

फ्रान्समध्ये सध्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम आहे. या निवडणुतीकत अध्यक्ष म्हणून इमॅन्यूअल मॅक्रॉन यांना विजय जवळपास निश्चित आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची काय ध्येय धोरण असतील याच्या पेक्षा त्यांच्या व्यक्तीगत जीवनाबाबतच सध्या माध्यमांमध्ये रकाने भरुन लिखात होत आहे. त्याला कारणही तसंच आहे. मॅक्रॉन हे 39 वर्षांचे आहेत. तर त्यांची पत्नी ही तब्बल 64 वर्ष वयाची आहे. अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीच्या वयामध्ये एवढ डिफरन्स कसा आणि त्यांचे प्रेम कसे जुळले यावरच माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यांच्या प्रेमाचीही अनोखी कथा आहे.  मॅक्रॉन हे 15 वर्षांचे असताना त्यांना ड्रामा शिकवायला ब्रिगिट्टी या शिक्षीका होत्या. पहिल्याच वर्षी त्यांचे सूत जुळले. ब्रिगीट्टीही त्यावेळी विवाहीत होत्या. त्यांना तीन मुलंही होती.  मॅक्रॉन पहिल्याच भेटीत आपल्या शिक्षीकेच्या प्रेमात पडले. त्यानंतर ते 18 वर्षांचे झाल्यानंतर त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. मॅक्रान यांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला. त्यासाठी त्यांची ती शाळा बंद करुन दुस-या शाळेत टाकण्यात आले. मात्र लग्न करण्यावर  दोघेही ठाम होते. मॅक्रॉन यांनी ब्रिगीट्टी यांच्या मुलांचीही लग्नासाठी परवानगी घेतली होती.  मॅक्रॉन यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर ब्रिगिट्टी यांनी पहिल्या पतीपासून रितसर घटस्फोट घेतला आणि मॅक्रॉन यांच्याशी विवाह केला.

COMMENTS